निर्मिकाचा समर्थक बनण्याचा एक लाभ म्हणजे पोस्ट्सद्वारे खास कंटेंटचा ॲक्सेस मिळवणे. तुम्ही समर्थक असाल पण तुम्हाला पोस्ट्सना ॲक्सेस नसेल, तर संभाव्य समस्यांचे निवारण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी तपासू शकता.
या लेखात, आम्ही पुढील गोष्टींविषयी सांगू:
- कोणत्या स्तरांना पोस्टचा ॲक्सेस आहे ते तपासणे
- तुमच्या पेमेंट स्टेटसची पडताळणी करणे
- तुमच्या सदस्यतेच्या तपशीलांची पुष्टी करणे
- पेट्रिऑन बाहेरील कंटेंट ॲक्सेस करणे
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न
कोणत्या स्तरांना एखाद्या पोस्टचा ॲक्सेस आहे ते तपासा
पोस्ट लॉक असल्यास, कोणत्या स्तरांना ॲक्सेस आहे हे तपासण्यासाठी लॉक्ड चिन्हावर क्लिक करा. तुम्ही एखादी पोस्ट ॲक्सेस करू शकता की नाही याची पुष्टी करण्याचा हा एक जलद आणि सोपा मार्ग आहे. तुमचा स्तर त्या यादीत नसल्यास, निर्मिकाने पोस्ट प्रकाशित करताना तुमचा स्तर समाविष्ट केलेला नाही.
तुमचा स्तर त्या यादीत असल्यास, परंतु तरीही तुम्हाला ॲक्सेस नसेल तर कृपया इतर संभाव्य समस्या निवारणांसाठी वाचत रहा.
तुमच्या पेमेंट स्टेटसची पडताळणी करा
डिफॉल्टनुसार, जेव्हा समर्थकाचे पेमेंट नाकारले जाते तेव्हा आम्ही निर्मिकाच्या पोस्ट्स लॉक करतो. सर्वकाही अद्ययावत असल्याची खात्री करण्यासाठी तुम्ही तुमचा पेमेंट इतिहास तपासू शकता.
तुमच्या पेमेंट स्टेटसची पडताळणी कशी करायची ते येथे दिले आहे:
- तुमच्या प्रोफाइल अवतारवर कर्सर न्या आणि सदस्यता व्यवस्थापित करा वर क्लिक करा
- नंतर बिलिंग इतिहास टॅबवर क्लिक करा
- तुमचा मागील पेमेंट इतिहास स्क्रोल करा — तुम्हाला कोणतीही नाकारलेली बिले दिसल्यास, तुम्ही पुन्हा प्रयत्न करा बटणावर क्लिक करू शकता आणि पुन्हा शुल्क भरण्याचा प्रयत्न करण्यासाठी आवश्यक पायऱ्या पूर्ण करू शकता
नाकारलेल्या पेमेंटचा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सहाय्याची आवश्यकता असल्यास, कृपया हे मदत मार्गदर्शक पहा: माझे पेमेंट पुन्हा करण्याचा प्रयत्न करा (नाकारलेले)
तुमच्या सदस्यतेच्या तपशीलांची पुष्टी करा
निर्मिक पोस्टचा ॲक्सेस त्यांच्या स्तरांनुसार विभागू शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही निर्मिकाच्या सर्वोच्च स्तरात असाल आणि तुम्हाला ॲक्सेस नसलेल्या पोस्टवर आला आहात. तुमच्या स्तराची आणि ॲक्सेस पातळीची पुष्टी करण्यासाठी तुम्ही तुमचे सदस्यता तपशील तपासू शकता.
तुमचे सदस्यता तपशील कसे तपासायचे:
- तुमच्या प्रोफाइल अवतारवर कर्सर न्या आणि सदस्यता व्यवस्थापित करा वर क्लिक करा
- निर्मिक शोधा आणि संपादन लिंकवर क्लिक करा
- तुमच्या स्तराचे नाव सारांश विभागात सूचीबद्ध केले जाईल
- तुम्ही चुकीच्या स्तरात असल्यास (अरेरे!), इथून तुम्ही संपादन लिंकवर क्लिक करू शकता
- तुमची सदस्यता स्वनिर्धारित वचनबद्धता म्हणून सूचीबद्ध असल्याचे तुम्हाला आढळल्यास, याचा अर्थ तुम्ही सध्या कोणत्याही स्तरामध्ये नाही आहात — निर्मिकाच्या एखाद्या स्तरामध्ये सामील होण्यासाठी आणि ॲक्सेस अनलॉक करण्यासाठी संपादन करा वर क्लिक करा
तुम्ही या महिन्यात आधीच जेवढे पैसे भरले आहेत त्याच किंमतीच्या स्तरात तुम्ही जात असाल, तर काळजी करू नका, तुमची सध्याची वचनबद्धता कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्या वचनबद्धतेसाठी जमा होईल.
तुम्ही अलीकडे रद्द केले आहे का?
तुमच्या सदस्यतेसाठी आगाऊ शुल्क आकारले गेले असल्यास आणि तुम्ही नुकतेच रद्द केले असल्यास, तुम्हाला चालू महिन्याच्या उर्वरित कालावधीसाठी पोस्टचा ॲक्सेस असेल (उदा. तुम्ही 15 जानेवारीला रद्द केल्यास, तुम्हाला 31 जानेवारीपर्यंत ॲक्सेस असेल).
तुमची सदस्यता मासिक (आगाऊ आकारणी नाही) किंवा प्रति निर्मिती प्रकारची असल्यास, तुम्ही रद्द करता तेव्हा तुम्ही पोस्ट्सचा ॲक्सेस गमावाल. रद्द केल्यास काय घडणे अपेक्षित आहे, याबद्दल तुम्ही येथे अधिक जाणून घेऊ शकता: मी रद्द केल्यावर काय होते?
पेट्रिऑन बाहेरील कंटेंट ॲक्सेस करणे
आम्ही निर्मिकांना त्यांचे पॉडकास्ट्स, व्हिडिओज आणि इमेजेस समर्थकांसोबत शेअर करण्यासाठी पोस्ट करण्याचे विविध पर्याय ऑफर करतो. असे असले तरी, आम्हाला हे समजते की बरेच निर्मिक त्यांचा खास कंटेंट ते पेट्रिऑनच्या बाहेर व्यवस्थापित करत असलेल्या वेबसाइटवर ठेवणे पसंत करतात.
तुमच्या सदस्यतेमुळे तुम्हाला ॲक्सेस मिळाला पाहिजे असा कंटेंट तुमच्याकरता लॉक केलेला आढळला आणि तुम्ही या लेखातील चेकलिस्ट पाहिलेली असेल, तर ॲक्सेस परत मिळवण्यासाठीच्या पुढील पायऱ्यांसाठी निर्मिकाशी संपर्क साधा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
मी अजूनही पोस्ट्स ॲक्सेस करू शकत नसल्यास काय?
तुमच्या स्तरासाठी एखादी पोस्ट लॉक केली असल्यास, परंतु तुम्हाला ॲक्सेस असायला हवा असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया तुमच्या निर्मिकाला सांगा. कोणत्या पोस्ट्स तुम्हाला ॲक्सेस करता यायला हव्यात याबद्दल त्यांना अधिक माहिती असेल आणि एखादी चूक असल्यास ते पोस्ट ॲक्सेस करण्याच्या समस्यांचे निराकरण करू शकतात.
माझ्या पेमेंट रकमेने सर्व काही अनलॉक का होत नाही?
आपली सदस्यता कशी चालवायची याबाबत प्रत्येक निर्मिकाचा एक खास वेगळा दृष्टिकोन असतो. निर्मिक खालीलप्रकारे पोस्ट ॲक्सेस सेट करू शकतात:
- सार्वजनिक: तुमच्या निर्मिकाकडून जगाला एक भेट! या पोस्ट्स प्रत्येकासाठी उपलब्ध असतात.
- सर्व समर्थकांसाठी: निर्मिकाचा प्रत्येक समर्थक पोस्टचा कंटेंट पाहू शकेल — अगदी स्वनिर्धारित वचनबद्धता असलेले लोकदेखील
- निवडक स्तर: निर्मिक पोस्टला ॲक्सेस देण्यासाठी विशिष्ट स्तरांची निवड करू शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही उच्च स्तरावर असलात तरीही, तुम्हाला पोस्टच्या कंटेंटला ॲक्सेस नसू शकेल. पोस्टला अपेक्षित ॲक्सेसबद्दल अधिक माहितीसाठी तुमच्या स्तराचे वर्णन वाचा. तुम्हाला खात्री नसल्यास, तुमच्या निर्मिकाला स्पष्टीकरण विचारण्यासाठी पटकन एक मेसेज पाठवल्याने गोष्टी स्पष्ट होऊ शकतात.
मला वाटले की खालच्या स्तरांना ॲक्सेस असलेल्या सर्व गोष्टींचा ॲक्सेस उच्च स्तरांनाही मिळाला आहे?
तुमच्या स्तरामध्ये खालच्या सर्व स्तरांमधील लाभांच्या ॲक्सेसचा उल्लेख असल्यास, तुमच्या निर्मिकाला विचारा. तुमच्यासाठी लॉक केलेली पोस्ट कदाचित लाभाशी संबंधित नसेल (अपग्रेड करण्याच्या आवाहनासारखी). ही कदाचित सहज दुरुस्त करता येणारी चूक असेल किंवा स्तरांच्या रचनेतील बदल असू शकेल.
मी पेमेंटची रक्कम भरत आहे, परंतु मी त्या स्तरामध्ये नाही हे कसे शक्य आहे?
आम्ही समर्थकांना प्रत्येक स्तर पातळीवर किती पैसे द्यावेत हे निवडा हा पर्याय देतो. तुम्हाला एखाद्या उच्च स्तरात सामील व्हायचे नसले तरीही तुम्ही नेहमीच तुमच्या स्तराच्या किमतीपेक्षा अधिक पैसे देऊ शकता.
तुमची सदस्यता वाढवताना फक्त पेमेंट रक्कमच नव्हे तर स्तर अपग्रेड करण्याची आम्ही शिफारस करतो. तुम्ही वरच्या स्तराची निवड न केल्यास तुमची पेमेंट रक्कम वाढवूनही नवीन पोस्टचा कंटेंट अनलॉक होणार नाही.